शिवसेना रत्नागिरीच्या वतीने इफ्तार पार्टी साजरी
दरवर्षीप्रमाणे यंदा ही नाईक हॉल,उद्यमनगर येथे रत्नागिरी शिवसेने च्यावतीने मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आयोजित दावत-ए-इफ्तार, इफ्तार पार्टी शिवसेना उपनेते,म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. त्याप्रसंगी नगराध्यक्ष बंड्या साळवी,जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,उपजिल्हाप्रमुख संजय साळवी,विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, मुस्लिम समाजाचे शकील मोडक,अलिमिया काझी,रज्जाक काझी,शकील मझंगावकर,यासिन मामु,शिकलं मूर्तुझा,शिवसेना नगरसेवक राजन शेट्ये,निमेश नायर, राजू भटलेकर तसेच सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.