
शिक्षक भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा ३१ मे पर्यंत, शिक्षक उमेदवारांना दिलासा
रत्नागिरी ः संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू झाला असून शिक्षक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. अनेक शाळांमधून प्राधान्यक्रम भरण्यासाठी पवित्र पोर्टलचीही नुकतीच सुरूवात झाली असून ३१ मे पर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील गेल्या ९ वर्षापासून लाखो बीएडधारकांचे शिक्षक भरतीकडे लक्ष लागले होते. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राधान्यक्रम भरण्याबाबत पवित्र पोर्टलवरून व्हिडिओ आणि माहिती पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली असून वित्र मार्गाने भरती करण्याबाबतचा व्हिडिओ अवघ्या काहीच दिवसात अपलोड होणार आहे. पवित्र पोर्टल सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाचवेळी पाहता येणार आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार सुखावले आहेत.