निवडणुकीच्या काळात थंडावलेले चोरटे परत सक्रिय चिपळुणात पाच फ्लॅट फोडले 

चिपळूण ः चिपळूण बस स्थानकाजवळ गजबजलेल्या ठिकाणी भिंगार्डे कॉम्प्लेक्समधील पाच सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडल्या. एका सदनिकेतून रोख पंचवीस हजार रुपये चोरीस गेले आहेत.
चिपळूण बसस्थानकाजवळ भिंगार्डे कॉम्प्लेक्स आहे. दिवसरात्र हा गजबजलेला भाग आहे. या ठिकाणी विंग सी या इमारतीमधील ५ बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. समीर पांचाळ हे कुटुंबाला घेवून लांजा येथे गेले होते. त्यांनी घरात २५ हजार रुपये ठेवले होते. चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. पैसे आणि लहान मुलाचे वाळे आणि सोन्याच्या कुंड्या चोरट्यांनी लांबविल्याचे तक्रारीत म्हटल आहे. त्यानंतर चोरट्यांनी विलास बनसोडे यांच्या सदनिकेत प्रवेश केला. मात्र त्या ठिकाणी त्याना काहीही मिळाले नाही. त्यानंंतर मोरे व राठोड यांच्या सदनिकेतही सामान अस्ताव्यस्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button