
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्यावतीने अरविंद सावंत मंत्रिमंडळात
रत्नागिरी ः आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी दिल्ली येथे पार पडत असून या मंत्रिमंडळात नव्या चेहर्यांना प्राधान्य देणार असल्याचे कळते. अरूण जेटलींसह काही ज्येष्ठ नेत्यांचा वैयक्तिक कारणामुळे मंत्रिमंडळात सहभाग नसणार असल्याचे कळते. नरेंद्र मोदी दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात जय्यत तयारी करण्यात आली असून या शपथविधीला १४ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे कळते. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांचा समावेश निश्चित समजला जात आहे. तर शिवसेनेच्यावतीने कॅबिनेट मंत्रीपदासाठी अरविंद सावंत यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त आहे