
कामे अर्धवट टाकणार्या सुशिक्षित बेरोजगारांसह मजूर सोसायट्यांवर कारवाई करण्याची मागणी
चिपळूण ः गेल्या काही वर्षापासून कामे घेवूनही ती अर्धवट सोडून देणार्या, कामे सुरूच न करणार्या सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर सोसायट्यांवर कारवाईचा निर्णय घेवूनही आजतागायत कारवाई न झाल्याने त्या त्या भागातील ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तक्रार असलेल्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असा ठराव नुकताच जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समतीच्या बैठकीत करण्यात आला.