
महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी निवासस्थाने दिली भाड्याने?
शिरगांव (चिपळूण) ः कोयना जलविद्युत केंद्र पोफळी वसाहतीमध्ये कर्मचार्यांनी स्वतःच्या नावाने निवासस्थाने घेवून त्रयस्थ व्यक्तीला भाड्याने देवून देशाच्या व कंपनीच्या सुरक्षेला धोका निर्माण करीत आहेत आणि कंपनीची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून वसुली करावी अशा आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी कोयना जलविद्युत केंद्र संकुल मुख्य अभियंता यांना पाठविले आहे तर दोषी कर्मचार्यांना स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता पाठिशी घालत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.