पाऊस लांबल्यास एमआयडीसी ५० टक्के पाणी कपातीच्या तयारीत
रत्नागिरी ः जूनपर्यंत पावसाने हजेरी लावली नाही तर एमआयडीसीमधील उद्योजक तसेच ग्रामपंचायतींना पुरविण्यात येणार्या पाणी पुरवठ्यात ५० टक्के पाणी कपात करण्याची भीती व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहरालगतचे एमआयडीसी हरचिरी व बावनदी या धरणातून पाणीपुरवठा केला जातो आता या धरणातील पाणी कमी झाल्याने सध्या रत्नागिरी एमआयडीसी परिसराला ८ ते ९ एमएलटी पाणी पुरवण्यात येते.
पण सध्या एमआयडीसी परिसराकडे ६ एमलएलटी इतकाच पाणीपुरवठा होत आहे. पण सध्या पाण्याची स्थिती पाहता ४ किंवा ५ जूनपर्यंत पाऊस आला नाही तर त्यानंतर ३ एमएलटी म्हणजे ५० टक्के पाणीपुरवठा कपात करावी लागेल अशी स्थिती आहे. रत्नागिरी एमआयडीसीकडून काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो पण आता पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने आता एमआयडीसीला पावसावरती अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे येत्या ४ किंवा ५ जूनपर्यंत पाणी कपात करावी लागणार आहे.