
कोकण रेल्वेचा वेग १० जूनपासून मंदावणार
रत्नागिरी ः पावसाळा हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांचे वेळापत्रक बदलणार असून १० जून ते ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वेचा वेग ताशी ४० कि.मी. इतका असणार असल्याने पावसाळ्यातील कमी वेगामुळे प्रवाशांचा प्रवास काहीसा उशीरा होणार आहे.
मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गाचा प्रशासनाकडून नुकताच आढावा घेण्यात आला. त्यात दरडग्रस्त मार्ग, संवेदनशील ठिकाणी यांची पाहणी करण्यात आली. मात्र अशा ठिकाणी विशेष लक्ष पुरवून पावसाळा कालावधीत तब्बल ६३० कर्मचारी, २४ तास गस्त घालून मार्गावर तैनात असणार आहेत.