
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे निवृत्त हाेणार?
गेली १२ वर्षे जिल्हा बँकेत सक्रीय असणारे आणि बँकेला राज्यस्तरावर एका वेगळा दर्जा प्राप्त करून देणार बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या कारभारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ते अधिकृत घोषणा करणार असून, बँकेच्या पाच वर्षाचा कालावधी संपण्यासाठी काही महिने शिल्लक असतानाच डॉ. चोरगे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मे २०२० मध्ये संचालक मंडळाची मुदत संपत आहे. डॉ. चोरगे यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या भावना कळविलया आहेत.
www.konkantoday.com