
अंगणवाडीसेविकेना स्मार्टफोन देऊन कारभार गतिमान होणार
रत्नागिरी ः कारभार गतीमान करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकेच्या हाती स्मार्ट फोन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २,७४६ सेविका, १४ पर्यवेक्षिकांसाठी सिमकार्डसह तीन हजार ऍन्ड्रॉईड मोबाईल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच या मोबाईचे वाटप करण्यात येणार आहे. जूनमध्ये ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पोष अभियान अंतर्गत (आयसीटी आरटीएम) या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असुन सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पाठपुरावा होत असल्याने गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या होत्या. यासाठी मे. सिस्टेक आयटी सोल्युशन कंपनीकडून मोबाईल खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे