बारावीचा निकाल जाहीर,कोकण विभागाची बाजी
पुणे दि.२८ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला असून, 85.88 टक्के राज्याचा निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. 90.25 टक्के मुली आणि मुले 82.40 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. कोकण विभाहाचा निकाल 93.23 टक्के सर्वाधिक लागला आहे. यंदा नागपूर निकालाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून www.mahresult.nic.in संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शंकुतला काळे यांनी आज पत्रकार परिषद घेत निकालाची माहिती दिली.
मंडळाच्या वतीने 21 फेब्रुवारी ते 20 मार्च यादरम्यान पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नऊ हजार 771 कनिष्ठ महाविद्यालयांतून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 12 लाख 31 हजार 159 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेतली जाईल. तसेच बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2019 आणि फेब्रुवारी-मार्च 2020 अशा दोनच संधी उपलब्ध करून देण्यात येतील,” असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.
*_विभागानुसार निकाल_*
कोकण -93.23 टक्के
कोल्हापूर – 87.12 टक्के
पुणे- 87.88 टक्के
औरंगाबाद- 88.29 टक्के
अमरावती- 87.55 टक्के
नागपूर- 82.51टक्के
लातूर- 86.08 टक्के
नाशिक- 84.77 टक्के
मुंबई – 83.85 टक्के.