
जि. प. अध्यक्षांना डावलून प्रशासकीय निर्णय, सदस्यांची नाराजी
रत्नागिरी ः जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी यांना डावलून अधिकारी, खातेप्रमुख एकतर्फी प्रशासकीय निर्णय घेत असल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी सर्वसाधारण सभेत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. प्रशासनाच्या निर्णयाची माहिती जि.प. पदाधिकारी, सदस्यांना अधिकारानुसार मिळालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसााधारण सभा अपेक्षेनुसार वादळी ठरली. उपाध्यक्ष संतोष गोवळे, सभापती विनोद झगडे, सहदेव बेटकर, प्रकाश रसाळ, साधना साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल योगल हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.