
कोरोना प्रतिबंधक लस आता लवकरच घरोघरी जाऊन दिली जाणार
कोरोना प्रतिबंधक लस आता लवकरच घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व अंथरुणाला खिळलेल्या विकलांग नागरिकांचे घरीच लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहिली जाणार नाही, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली. या लसीकरणाची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर पुणे येथून करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.
www.konkantoday.com
