
आमदार उदय सामंत यांना उत्कृष्ट विधायक पुरस्कार
रत्नागिरी ः विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविणार्या पुणे येथील नामवंत ब्रह्मकेसरी या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट विधायक या पुरस्कारासाठी म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची निवड करण्यात आली असून २३ जून रोजी कै. अंकुशराव लोडगे सभागृह, भोसरी, पुणे येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
ब्रह्मकेसरीच्यावतीने नेमण्यात आलेल्या निवड समितीने राज्यभरातील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करुन त्यातून म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.