अखेर मदत ग्रुप, रेस्क्यू टीमच्या पथकाने बुजविले खड्डे

खेड ः खेड ते भरणा नाका मार्गावरील बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ खोदलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. मिहिर जैन या तरूणाचा याच खड्ड्यांमुळे अपघात झाला होता. तरीही प्रशासन जागे झाले नाही. मात्र मदत ग्रुप व रेस्क्यू टीमसारख्या सेवाभावी संस्थेचे प्रसाद गांधी, बुरान टाके, विवेक बनकर, आशिष तलाठी, इंद्रकुमार रायका आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ सिमेंट आणि खडीचा वापर करत हे खड्डे बुजविले.
खेड ते भरणे नाका मार्गावरील बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ जीवघेणे ठरणारे खड्डे बुजविण्यात यावेत अशी सातत्याने मागणी जनमानसातून होत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button