१२ वी HSC चा नीकाल उद्या होणार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा (HSC Result) निकाल उद्या म्हणजेच 28 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक काढत याची माहिती दिली आहे. बारावी निकालाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सूकता होती. पण आता मंगळवारी हा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यभरातील १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी या १२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण २ हजार ९५७ केंद्रांवर १२ वीची परीक्षा घेतली गेली.