नगराध्यक्ष राहुल पंडित आजच्या मुहूर्तावर राजीनामा देणार? नगराध्यक्षपदाची फेर निवडणुक होण्याची शक्यता

रत्नागिरी ः रत्नागिरी शहराने पाच वर्षाकरिता निवडून दिलेले राहुल पंडित हे पक्षादेशाप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त असून त्यासाठी आजचा मुहूर्त साधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात गेले पाच महिने पालिकेच्या उंबरठ्यापासून दूर राहिलेले पंडित पालिकेच्या कारभारातून स्वतःची सुटका करून घेणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानीही राजीनामा देण्याला मान्यता दिली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीसाठी शिवसेनेमार्फत तीनजण उमेदवारीसाठी इच्छुक होते. भाजप, राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते उमेश शेट्ये यांच्याशी सामना करताना उमेदवार उच्चशिक्षित, सुसंस्कृत असल्याचे जाहिरा करत राहुल पंडित यांना उमेदवारी दिली परंतु त्यावेळी प्रबळ दावेदार असलेल्या प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांना दोन वर्षानंतर नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात व शहरात भगवी लाट दिसून आल्याने वरिष्ठांनी हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Back to top button