कादिवली नदीत पोहायला गेलेल्या १६ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

0
476

दापोली ः तालुक्यातील कादिवली विठ्ठलवाडी येथील काही तरूण रविवारी येथील दादर पुलाजवळील नदीत पोहायला गेले होते. त्यातील एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील कादिवली विठ्ठलवाडी येथील सिद्धेश म्हसकर, किशोर कांगणे व राजवीर विजय चांदे आपल्या मित्रासह रविवारी दुपारी कादिवली येथून माटवण नवानगर दादर पूल येथील नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते. यातील आंघोळीला गेलेले पाचजण, नदीच्या पात्रातील दगडावर बसले होते व एकमेकांवर पाणी उडवत होते. तर राजवीर चांदे हा पाण्यातील एका लाकडाच्या ओंडक्यावर बसला होता. यातील किशोर म्हसकर यालाच फक्त पोहता येत होते.
यावेळी राजवीर लाकडाच्या ओंडक्यावरून तोल जावून खाली पाण्यात पडला. किशोर याला वाचवायला गेला होता पण त्याला राजवीरला वाचविणे शक्य झाले नाही. सर्वांनी आरडाओरड करायला सुरूवात केली तेव्हा आजुबाजूला असलेले ग्रामस्थ धावत आले. या सर्वांनी नदीत राजवीरचा शोध घेण्यास सुरूवात केली असता त्याचा मृतदेह सापडला.