चिपळूण बसस्थानकाचे काम धिम्यागतीने

चिपळूण येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम धिम्यागतीने सुरू आहे गेल्या आठ महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली असली तरी कामाने वेग घेतलेला नाही आता पावसाळा जवळ आल्याने कामाचा वेग आणखीनच मंदावणार आहे. चिपळूण येथे अद्यावत बस स्थानक उभारण्यात यावे अशी चिपळूणकरांची अनेक वर्षांची मागणी होती त्याप्रमाणे आराखडा मंजूर होऊन त्यासाठी निधीही उपलब्ध झाला प्रत्यक्ष आठ महिन्यांपूर्वी बांधकामाला सुरुवात झाली या कालावधीत पाया पूर्ण होईल असा अंदाज होता परंतु प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही सध्या तरी यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.

Related Articles

Back to top button