राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय भारतात १८५ व्या स्थानावर
देवरूख ः प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने भारतात १८५ वे स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम ३०, मुंबई विद्यापीठातील सर्वोत्तम १० खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश करण्यात आला आहे.
इंडिया टुडे या नामांकित साप्ताहिकाच्या वतीने भारतातील अभियांत्रिकी महाविद्यायांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर २०० खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची क्रमवारी एका विशेषघंकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत आंबव महाविद्यालयाने १८५ वे स्थान मिळविले आहे. विविध निकषांच्या आधारे महाविद्यालयांच्या सर्वांगीण कामगिरीचा आढावा घेवून क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे.