
गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा मृत्यू
राजापूर ः रानतळे भू मार्गावरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलसमोर स्पीडब्रेकरवर दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात भू येथील सौ. तेजस्विनी वैभव सरफरे (२७) या विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेजस्विनी सरफरे या राजापूर ग्रामण रूग्णालयात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.
सौ. तेजस्विनी सरफरे राजापूर शहरात एका लग्न समारंभाकरिता आल्या होत्या. लग्नसमारंभ आटोपून पती वैभव यांच्या दुचाकीवरून त्या पुन्हा आपल्या घरी भू येथे चालल्या होत्या. रानतळे भू मार्गावरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलसमोर स्पीडब्रेकरवरून जात असताना दुचाकीला धक्का बसला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना राजापूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.