राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू अशोक चव्हाण यांचे निधन
चिपळूण ः राष्ट्रीय शरीरसौष्ठव व ज्येष्ठ व्यायामपटू आणि येथील नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक अशोक चव्हाण यांचे नुकतेच पेण येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमययी ते ५७ वर्षांचे होते.
मजबुत व पिळदार शरीरयष्टी असलेले अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली होती. जिल्ह्यातील आदर्श शरीरसौष्ठवपटूंपैकी ते एक होते. केवळ स्वतःपुरते या क्षेत्रात काम न करता गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक शरीरसौष्ठपटू घडवले आहेत. येथील नगर परिषेदच्या हनुमान व्यायाम शाळेचीही अनेक वर्षे त्यांनी सूत्रे सांभाळली होती.




