रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित देणार पदाचा राजीनामा?
रत्नागिरी ः रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते राजीनामा देण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त होत होती.
आपला दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच दिलेल्या शब्दाप्रमाणे पदाचा राजीनामा देणार असल्याचे पंडित यांनी म्हटले होते. गेले तीन महिने ते रजेवर होते. यामुळे कारभार प्रभारी नगराध्यक्षांकडे होता.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले. रत्नागिरी शहरातून महत्वपूर्ण आघाडी मिळाली. यामुळे आता शिवसेनेसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची वाटचाल सोपी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंडीत यांचा राजीनामा मंजूर होवू शकतो