
दुचाकीवरून पडून विवाहितेचा मृत्यू
राजापूर ः रावतळे भू मार्गावरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलसमोर स्पीडब्रेकरवर दुचाकीवरून पडून झालेल्या या अपघातात भू येथील सौ. तेजस्विनी वैभव सरफरे (२७) या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तेजस्विनी सरफरे या राजापूर ग्रामीण रूग्णालयात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्या राजापूर शहरात एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या. लग्नसमारंभ आटोपून पती वैभव यांच्यासह दुचाकीवरून त्या पुन्हा आपल्या घरी भू येेथे चालल्या होत्या. रावतळे भू मार्गावरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलसमोर स्पीडब्रेकरवरून जात असताना दुचाकीला धक्का बसला. त्यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या तेजस्विनी गाडीवरून पडून रस्त्यावर पडल्या. तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दागल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.