जि.प. शाळांत दाखल होणार सव्वाबारा हजार मुले

रत्नागिरी ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिलीत १२ हजार २८८ संभाव्य मुले दाखल होणार आहेत. यामध्ये ६२१२ मुले तर ६०७६ मुलींचा समावेश आहे. १७ जूनपासून शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना नियमित शाळेत शंभर टक्के पटनोंदणी, शंभर टक्के उपस्थिती टिकविणे व सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. शाळेत प्रवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेचा ओढा वाढेल या पार्श्‍वभूमीवर प्रथम दिवशी आणि शाळापूर्व दिवशी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गावागावात पहिली प्रवेशासाठी आणि पटसंख्या टिकविण्यासाठी शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक प्रयत्न करत होते. शाळेच्या आधी एक दिवस सर्व शाळांमध्ये शैक्षणिक पदयात्रा, गृहभेटी करण्यात येणार असून यामध्ये शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचाही सहभाग घेणेत येईल. दाखलपात्र मुलांच्या घरी जावून मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button