‘समृद्धी’चा प्रवास महाग, ‘फास्टॅग’ही सक्तीचा!

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आज, मंगळवारपासून महागला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १९ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे आता छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी १०८०ऐवजी १२९० रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे राज्यातील सर्वच महामार्गांवर टोलवसुलीसाठी आजपासून ‘फास्टॅग’ प्रणाली सक्तीची झाली असून सर्व ‘हायब्रीड’ मार्गिका मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी ‘फास्टॅग स्टिकर’ किंवा त्या खात्यात रक्कम नसल्यास दुप्पट पथकर द्यावा लागेल.

*७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा टप्पा सेवेत दाखल झाला असून अखेरचा इगतपुरी-आमणे हा ७६ किमीचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असला तरी प्रवाशांना आता वाढीव आर्थिक भार सहन करावा लागेल. शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई-नागपूर एकेरी प्रवासासाठी हलक्या चारचाकी वाहनांना १४४५ रुपये मोजावे लागतील.दुसरीकडे केंद्राच्या निर्देशानुसार राज्य सरकारने पथकर नाक्यांवरील वसुलीसाठी आज, मंगळवारपासून ‘फास्टॅग’ सक्तीचा केला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व पथकर नाक्यांवरील ‘हायब्रीड’ (फास्टॅक तसेच रोख रकमेची सुविधा असलेल्या) मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत.

आता फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दंड म्हणून दुप्पट पथकर वसूल केला जाणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांना तातडीने ‘फास्टॅग स्टिकर’ लावून घ्यावेत, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीकडून विविध रस्ते प्रकल्पांत पथकर वसुली केली जाते. एमएसआरडीसीकडून सध्या राज्यातील नऊ रस्ते प्रकल्पांत पथकर वसुली केली जाते. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) अटल सेतूवर पथकर वसुली केली जाते.

एकेरी प्रवासासाठी पथकर*

प्रकार – जुना दर – नवा दर हलकी चारचाकी वाहने

१०८० १२९०

हलकी व्यावसायिक वाहने

१७४५ २०७५

बस, दोन आसांचे ट्रक

३६५५ ४३५५

तीन आसांची व्यावसायिक वाहने

३९९० ४७५०

बांधकाम यंत्रसामग्री

५७४० ६८३०

अतिअवजड वाहने

६९८० ८३१५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button