
हर्णे बंदरात ’बिलजी’ माशाची आवक वाढल्याने दरात माेठ्या प्रमाणावर घसरण.
दापाेली तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या बिलजी मासळीची आवक वाढली आहे. परंतु छाेट्या आकारामुळे बिलजी मासळीच्चा दर किलाेला 25 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे छाेटे मच्छीमार पुन्हा अडचणीत सापडले आहेत. सध्या सर्वत्र बिलजी मासळी माेठ्या प्रमाणात मिळत आहे. हर्णे बंदरात ही बिलजीची आवक वाढलेली दिसत आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी किलाेला 100 रुपये मिळणारा दर सध्या 25 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे मासळी जास्त मिळूनही धंदा ताेट्यात अशा प्रकाराने येथील मच्छीमारं पुन्हा चिंतीत आहे. बिलजी मासळीसाठी पुणे व गाेवा ही मुख्य मार्केट असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हर्णेत मासळी साठवणुकीसाठी अद्ययावत सुविधा नसल्यामुळे मिळेल त्या दरात मासळी विकावी लागत आहे.www.konkantoday.com