भारत विजयी झाला – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली :’भारत पुन्हा विजयी झाला’ अशी पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर व्यक्त केली आहे. देशात पुन्हा एकदा मोदालाट उसळली असून केंद्रात पुन्हा एकदा पूर्ण बहुमतातलं एनडीए सरकार विराजमान होणार, असे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.
‘सबका साथ+सबका विकास+सबका विश्वास= विजयी भारत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार. सर्वांना सोबत घेऊन आम्ही भरभराट आणणार. एकजुटीतून आम्ही सशक्त आणि सर्वसमावेशक भारताचे निर्माण करणार’, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असताना मोदींवर विविध देशांच्या प्रमुखांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button