मत्स्यालय ठरले पर्यटकांचे आकर्षण 

रत्नागिरी ः रत्नागिरीत उभारण्यात आलेल्या मत्स्यालयाला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून हे मत्स्यालय पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण ठरत आहे. गेल्या वर्षभरात १ लाख ३१ हजार ८०९ पर्यटक आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटीमधून ३ हजाराहून अधिक पर्यटकांनी जलसफरीचा आनंद घेतला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत असलेले झाडगांव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामार्फत मत्स्यालय सुरू करण्यात आले आहे. या मत्स्यालयात गोड्या व खार्‍या पाण्यातील शोभिवंत मासे व पान वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे. गोडे पाणी विभागात २८ टाक्यांमध्ये अरोवाना, डिस्कस, कॅट फि, टेट्रा, फ्लॉवर, सिल्वल शार्क आणि खारे पाणी विभागात २२ टाक्यांमद्ये मोनोअँजल, केंंड, बटरफ्लाय, लायन, निमो, गोबरा अशा विविध जातींचे मासे पहायला मिळतात. गेल्या ५० वर्षापासून जोपासलेली दोन जातींची समुद्री कासवेही मत्स्यालयाचे आकर्षण ठरत आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात १ लाख १५ हजार ५७३ पर्यटक तर १६ हजार २३६ विद्यार्थ्यांनी या मत्स्यालयाला भेट दिली. तर सात ते आठ महिन्यापूर्वी सुरू केलेल्या बोटींमधून ३ हजाराहून अधिक पर्यटकांनी जलसफरीचा आनंद घेतला.

Related Articles

Back to top button