
मत्स्य महाविद्यालय नागपूरशी संलग्न करू नये यासाठी मत्स्यशास्त्र पदवीधर संघाचे निवेदन
रत्नागिरी ः मत्स्य महाविद्यालय नागपुरशी संलग्न करू नये यासाठी मत्स्यशास्त्र पदवीधर संघाने कोळी महासंघ नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनला निवेदन सादर केले आहे. तसेच कोळी फेस्टीव्हल संस्थेने राज्यपालांना निवेदन सादर केले आहे.
या सादर करण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटले आहे की, कोकणची नाळ ही समुद्राशी जोडली गेली आहे. येथील पारंपारिक मत्स्यव्यवसाय हा याच समुद्रावर अवलंबून आहे. मत्स्यव्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय हे आमच्या करिता उपयुक्त ठरले आहे.
आज रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय नागपुरशी संलग्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हे महाविद्यालय नागपूरशी संलग्न केल्यास आम्ही सर्व मच्छिमार रस्त्यावर येवून संघर्ष करू असा इशारा कोळी महासंघाचे सचिव राजहंस टपके, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भांजी, विकास कोळी यांनी दिला आहे.