पोलीस कर्मचार्याने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेचे वाचले प्राण
रत्नागिरी ः भाट्ये समुद्रात उडी मारून आत्महत्या करणार्या वृद्धेला दूरक्षेत्रातील पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले. दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी राजाभाऊ चाटे यांना समुद्रात एक महिला आत्महत्या करत असल्याचे कळले. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून भाट्ये पुलावरून खाली उतरत खोल पाण्यात उडी घेतली. व बुडणार्या महिलेला पाण्याबाहेर काढले. एका स्थानिक व्यक्तीनेही चाटे यांना सदर महिलेला बाहेर काढण्यास मदत केली. कौटुंबिक वादातून सदर महिलेने समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाण्याबाहेर काढल्यानंतर सदरची महिला शुद्धीत आल्यावर त्यांच्या नातेवाईकाना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आली.