रत्नागिरी नगर परिषदेचे स्वच्छता अभियान कागदावर ? चायनीज वाल्यांनी टाकले गटारे भरून
स्वच्छता अभियानाबद्दल रत्नागिरी नगर परिषदेला ३३वा क्रमांक मिळाला परंतु शहरात अनेक चायनीज हातगाड्या वाले ओला कचरा गटारात फेकून देत आहेत. मारुती मंदिर बसस्टॉप नजिक संपूर्ण गटारे कचऱ्याने भरून गेली आहेत.याशिवाय हे चायनीज वाले उरलेले शिळे अन्न याच ठिकाणी फेकून देत असल्याने तेथे दयनिय अवस्था झाली आहे.हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. नागरिकांना कचरा गाडीत कचरा टाकायची सक्ती करणारे नगर परिषद येथे मात्र दुर्लक्ष करीत आहे. याबद्दल नागरिकांच्यामधुन संताप व्यक्त करणेत येत आहे.