मे महिन्याच्या अखेरीस रत्नागिरी शहर परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार?
रत्नागिरी ः महाराष्ट्राप्रमाणे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उष्म्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. त्यातच मौसमी पाऊस ६ जूनपर्यंत केरळपर्यंत येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत रत्नागिरी शहर व आजुबाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या शहरातील काही भागांना व काही ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा केला जातो. सध्या एमआयडीसीने पाण्यात २५ टक्के कपात केली असून जर ही स्थिती राहिली तर मे अखेरीस एमआयडीसीकडून ५० टक्के कपात होण्याची शक्यता दिसत आहे. याचा परिणाम उद्योग व्यवसायावरही मोठ्या प्रमाणावर होणार आहे.