
प्रवाशांचे प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाने नेतृत्व करेन आ. दीपक केसरकर यांचा इशारा
सावंतवाडी ः कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे अनेक प्रश्न असून त्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. याबाबत जर प्रवाशांनी आंदोलन केले तर आपण त्याचे नेतृत्व करू असा इशारा राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाचा मंत्र्यालाच रस्त्यावर उतरावे लागते ही आश्चर्याची बाब आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनल आणि कोकण रेल्वेच्या अनेक प्रश्नांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सावंतवाडी येथे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या ठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देवून प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नावर आंदोलन झाल्यास आपण त्याचे नेतृत्व करु असेही त्यांनी स्पष्ट केले.