पानवल धरणावरील कर्मचार्यांसाठी असलेल्या इमारतीची दुर्दशा, विजेचाही पत्ता नाही
रत्नागिरी ः रत्नागिरी शहराला विनाखंड पाणी पुरवठा व्हावा यासाठी पानवल धरणावर अहोरात्र सेवा बजावणार्या पालिकेच्या पाणी विभागातील कर्मचार्यांना अंधार्या कोठडीतच रहावे लागत आहे. तर सुमारे ६० वर्ष जुन्या खोलीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्मचारी काम करीत आहेत परंतु पालिका प्रशासनाला कर्मचार्यांच्या जीविताशी काहीही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या इमारतीपूर्वी विजेची व्यवस्था होती परंतु सध्या येथे वीज उपलब्ध नसल्याने कामावर असलेल्या चार कर्मचार्यांना अंधारातच काम करावे लागते.