गांज्याची लागवड करणार्‍या दोघांना अटक

0
95

रत्नागिरी ः मंडणगड तालुक्यातील कुडूक खुर्द जंगमवाडी येथे राहणारे गणपत जंगम व प्रकाश जंगम यांनी घराच्या मागे गांज्याची रोपे व सुकी बी याचा साठा करून ठेवला होता. तसेच या परिसरात गांजाच्या रोपांची लागवड केली होती. याबाबत पोलिसांना खबर मिळताच त्यांनी तेथे धाड घातली असता तेथे गांज्याची रोपे व लागवड आढळून आली. पोलिसांनी या दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.