मोठ्या शहरात होणाऱ्या शस्त्रक्रियेची सुविधा रत्नागिरीत उपलब्ध
मुंबई पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमधून होणाऱ्या अवघड शस्रक्रिया आता शहरातील स्वस्तिक मेडिकल फाऊंडेशनच्या चिरायू हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालं आहेत. डॉक्टर अभिजीत पाटील व डॉक्टर श्री विजय फडके यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना जीवदान दिले आहे. रत्नागिरीत प्रथमच अशी सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती हॉस्पिटलचे ट्रस्टी आनंद फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. अत्याधुनिक यंत्रणा वापरून अत्यंत कमी खर्चात या शस्रक्रिया येथे करणे शक्य झाले आहे.यापूर्वी रुग्णांना यासाठी मुंबई पुण्यासह मोठ्या शहरात जावे लागत होते.