नसबंदी मोहीम राबूनहीभटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
रत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी यासाठी नसबंदी मोहीम राबविण्यात आली होती यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता परंतू तरी देखील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने ही योजना फसली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असूनकुत्र्याने चावा घेतलेल्या घटनेत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे मागील चार महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात अडीच हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना घडल्या फिक्की कडे आहेत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे कुत्र्यांना पकडण्यासाठी कोणती यंत्रणा नसल्याने यावर कोणतीही उपाययोजना होत नाही एकीकडे श्वानदंशाची संख्या वाढली असतानाच सर्पदंशाचे प्रकारही वाढले आहेत शेती कामाकरता अनेक वेळा शेतात जावे लागत असल्यानेतसेच उन्हाळ्यात सर्प बाहेर पडत असल्याने सर्पदंशाच्या घटना घडल्या गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात ३६२जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत