गाजावाजा झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांचे गुळमुळीत धोरण

लोकसभा निवडणुकीत अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली जाईल अशी अपेक्षा मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल असे वाटत होते परंतु प्रत्यक्षात तसे काही न करता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुळमुळीत धोरण स्वीकारले विशेष म्हणजे वरिष्ठांनी बोलावलेल्या या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश भाई कदम व चार तालुकाध्यक्ष हे गैरहजर राहिले होते या बैठकीत काँग्रेसच्या कोकणाच्या ताकदीबद्दल आत्मचिंतन करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी राजापूर चिपळूण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवेल जरी आघाडी झाली तरी या तीनही मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगावा असा एकमुखी ठराव बैठकीत करण्यात आला या बैठकीला काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नवीनचंद्र बांदोडकर निरीक्षक बीएम संदीप खासदार हुसेन दलवाई आमदार भाई जगताप प्रवक्ते हरिश रोगे हे नेते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुका सुधारून नव्या जोमाने पक्ष संघटना बळकट करूया असे ठरवण्यात आले येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गरज भासल्यास संघटनेत फेरबदल केले जातील असे सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button