रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता वगळता अंतर्गत भागात असलेले अनेक रस्ते खराब झाले असून अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्र्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होवू नये म्हणून रत्नागिरी नगर परिषदेने तातडीने शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले असून या कामाला सुरूवात झाली आहे.
रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यावर असलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्यात येतील व पावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त होईल असा विश्वास नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी व्यक्त केला आहे. काही ठिकाणी पॅचअप करून खड्डे दुरूस्त करण्यात येणार आहेत. खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी एकूण दीड कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.