अपघातात जखमी झालेले शिक्षक सीताराम भायजे यांचे उपचारादरम्याने निधन
रत्नागिरी ः पानवलनजिक एस.टी.ने ठोकरल्याने गंभीर जखमी झालेल्या सीताराम भायजे यांचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. शिक्षक पेशा असलेले सीताराम भायजे हे चोरवणे संगमेश्वर येथील आहेत. एक आठवड्यापूर्वी ते मोटरसायकलने जात असता रत्नागिरीकडे चाललेल्या बसने पानवळ येथे त्यांना ठोकरले होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे दुःखद निधन झाले.