
रायगड, पालघर, सिंधूदुर्ग या जिल्ह्यात आज २१ आणि उद्या २२ जूनला अतिवृ्ष्टीचा इशारा
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात स्थिर स्थावर झाला असून पंधरा जूनपासून पावसाने आपला मुक्काम महाराष्ट्रात ठोकला आहे. अशातच आज मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.कोकणातील रायगड, पालघर, सिंधूदुर्ग या जिल्ह्यात आज २१ आणि उद्या २२ जूनला अतिवृ्ष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणीही आज पावासाचे आगमन आझ होणार आहे. येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भात तुलनेत पाऊस कमी पडणार असून तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.