जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही अनेक गावे पाण्यापासून वंचित
रत्नागिरी ः जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून गावातील पाणी टंचाई कायमची दूर व्हावी यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली. त्यावर गेल्या तीन वर्षात करोडो रुपयांचा निधी खर्चही करण्यात आला. मात्र जिल्ह्यात या योजनेत समाविष्ठ असलेल्या गावांपैकी ९ गावात भूजल पातळीत घट झाल्याने करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही या गावात ३ कुटंुंबाना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करून मुबलक पाण्याबरोबर शेती, फलोद्यान वाढीला प्राधान्य देण्याच्या हेतूने जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात गेल्या चार वर्षात अंदाजे ४८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीदेखील या गावात या वर्षीही पाणी टंचाई निर्माण झाली असून जिल्हा परिषदेमार्फत ५५ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये जलशिवार अभियानातील २४ गावांचा समावेश आहे.