विजेची चोरी करणाऱ्यांना सत्तर हजाराचा दंड

गुहागर शृंगारतळी येथील एका इमारतीतील मूळ मीटरवरून टॅब मारून विजेची चोरी करणाऱ्या सात गाळे धारकांवर महावितरणाच्या भरारी पथकाने कारवाई केली या इमारतीत एकच थ्रीफेज मीटर होता त्यावरून सात गाळे धारकांना बेकायदेशीररित्या वीजपुरवठा करण्यात आला होता महावितरणाच्या भरारी पथकाने या ठिकाणी धाड घातली असता हा बेकायदेशीर प्रकार उघड झाला याप्रकरणी सात गाळेधारकांवर कारवाई करून त्यांचेकडून सत्तर हजार रुपये दंड वसूल करण्यात आला

Related Articles

Back to top button