मिरजोळे भागात बिबट्याचा वावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मिरजोळे भागात बिबट्यांचा वावर सुरू झाला आहे या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर आहे अनेकवेळा ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे यापूर्वी ग्रामस्थांच्या गुरे बकऱयांवर बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकारही घडले आहेत एक वर्षांपूर्वी या परिसरात मेलेला बिबट्या सापडला होता त्यामुळे या परिसरात अनेक बिबटय़ांचा वावर असावा असा ग्रामस्थांचा संशय आहे या भागात मोठी मनुष्य वस्ती असल्याने बिबट्यांचा वावर धोकादायक ठरणार आहे यासाठी वनविभागाने दखल घेऊन कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे