परवाना नसताना वाहन चालवणाऱ्या मुलांच्या पालकांविरुद्ध कारवाई होणार
वाहतूक परवाना नसताना अल्पवयीन मुले अथवा युवक यांना वाहने चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत कोणताही वाहन परवाना नसताना अनेक वेळा पालक आपल्या मुलांना वाहने चालवण्यास देत आहेत ही मुले वेगाने वाहने चालवित असल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत आरटीओच्या नवीन नियमानुसार अश्या वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे या नियमाचीतात्काळ अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकाऱयांनीरस्ता सुरक्षितेच्या बैठकीत सांगितले याशिवाय वाहन चालवित असताना मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यात यावा त्यांचे वर गुन्हे दाखल करण्यात यावेत असाही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण पोलीस निरीक्षक डिके पाटील वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे सर्व अनेक अधिकारी उपस्थित होते