
दापोली परिसरात ऑईल मिश्रित पाण्याचा पुरवठा
दापोली शहरातील कोंड परिसरात दापोली नगरपंचायतीकडून तेल मिश्रीत पाण्याचा पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले सध्या दापोलीत पाणीटंचाई असून दापोली नगरपंचायतीकडून दापोली शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे मात्र येणारे पाणी देखील अपुरे असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यातच पंचायतीकडून झालेल्या पाणीपुरवठ्यात होईल मिश्रित तवंग आढळल्याने नागरिकांचे हाल झाले एकतर दोन दिवसांनी पाणी आले ते देखील असे आल्याने नागरिकांना पिण्यास पाणी उपलब्ध झाले नाही अखेर नागरिकांना खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागले दापोली पंचायतीचा फिल्टरेशन प्लॅन्ट बंद असल्याचे पाणी सभापतींचे म्हणणं आहे एकीकडे काळ रत्नागिरीत झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत नागरिकांना दूषित पाणी पुरवू नये असे आदेश दिले असूनही नागरिकांना असा पाणीपुरवठा होत असल्याने नाराजी निर्माण झाली आहे