चिपळूण शहरात अतिक्रमण केलेल्यांवर नगर परिषदेने केली कडक कारवाई

चिपळूण शहरातील बाजारपेठेत खोके धारकांविरुद्ध नगर परिषदेने कडक कारवाई केली असून भाजी मंडई परिसरातील दहाहून अधिक खोकीधारकांचे स्टॉल जेसीबीने नगरपरिषदेने जमीनदोस्त केले तसेच या खोकेधारकांच्या मालही ताब्यात घेण्यात आला चिपळूण शहर बाजारपेठेतील भाजी मंडई इमारत भाजी व्यावसायिक आणि नगरपालिका असा वाद गेले तीन वर्षे सुरू आहे त्यामुळे अनेक भाजी व्यावसायिकांनी रस्त्याच्या बाजूला आपले स्टॉल उभारून व्यवसाय करत होते काहींनी शेड उभारून तर काहींनी तात्पुरते खोके उभारून हा व्यवसाय सुरू ठेवला होता त्यांना नगरपरिषदेने वेळोवेळी समज दिली होती परंतु त्यानी हा व्यवसाय सुरू ठेवल्याने नगर परिषदेने कडक कारवाई केली

Related Articles

Back to top button