
संभाजी महाराजांचे स्मारक लवकरच पूर्ण -जिल्हाधिकारी चव्हाण
कसबा गावातील संभाजी महाराजांच्या उत्तम गुणवत्तेचे स्मारक उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण यांनी दिली आहे. रयतेसाठी झटणारा राजा संभाजी राजा यांना कसबा गावी कैद करण्यात झाल्याने या गावचे महत्त्व अधिक वाढले आहे. या स्मारकासाठी नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .या स्मारकाचे काम चालू असून जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या कामाला भेट देऊन पाहणी केली.कसबा गावात अनेक ऐतिहासिक मंदिरे असून त्यांची दुरावस्था झाली आहे .ऐतिहासिक मंदिराचे वैभव जतन करण्यासाठी सध्यस्थितीचा अहवाल तात्काळ सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.