वैभववाडी तालुक्यातील हेत येथे सापडला अज्ञाताचा मृतदेह
वैभववाडी दि.१५-: हेत येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. मंगळवारी रात्री हेत शेवरी फाटा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या हा मृतदेह निदर्शनास आला.पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आज त्याचे शवविच्छेदन केले.तालुक्यातील हेत शेवरी फाटा येथे मंगळवारी रात्री रस्त्यावरील मोरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला. मृतदेह पुर्णपणे सडून गेला असल्याने ओळख पटविणे मुश्किल बनले.हा मृतदेह वेडसर व्यक्तीचा असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या संपूर्ण प्रकारची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलीसांना दिली.पोलीस उपनिरीक्षक श्री.शेणवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक वरवडेकर,मनोज कदम आदी पोलीस घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.